नगर ब्रेकिंग..करुणा धनंजय मुंडे यांच्या बदनामीचे षडयंत्र ? नगरसह इतरही ठिकाणाहून..

शेअर करा

शिवशक्ती पक्षाच्या सर्वेसर्वा करुणा धनंजय मुंडे यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केलेली असून त्यामध्ये आपल्याला बदनामी करण्याविषयक अनेक फोन येत असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये सदर प्रकरणात आपल्या जीविताला धोका झाल्यास आपले पती धनंजय मुंडे यांच्यासह इतर पाच व्यक्ती जबाबदार राहतील असेही म्हटलेले आहे. फेसबुकवर त्यांनी आपल्या तक्रारीचा फोटोही टाकलेला आहे.

काय आहे करुणा धनंजय मुंढे यांची तक्रार ?

मला वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन येत आहेत. प्रताप म्हणून पुण्यावरून फोन आला होता त्याचा मोबाईल नंबर 91 75 XXXXXX हा आहे. तो म्हणत होता की आम्ही लोक तुमची बदनामी करणार आहोत. तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणार आहोत त्यामुळे याची चौकशी करून बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

अहमदनगर मधून पण एका पत्रकाराचा फोन आला होता त्याचा मोबाईल नंबर 9225 XXXXXX हा आहे. तो म्हणत होता की तुमचे वाईट फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगचे काम सुरू आहे आणि तुम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहोत. आणखीन एका मोबाईल नंबरवर वरून मला अश्लील मेसेज फोटो सोबत आला आहे त्याचा मोबाईल नंबर 8498XXXXXX आहे आणि मला आणि माझ्या परिवाराला मानसिक त्रास देत आहेत की आम्ही आत्महत्या करावी. त्यामुळे ही वरील लोक आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठीचे काम जाणीवपूर्वक करत आहेत आणि हे सर्व लोक सामाजिक न्यायमंत्री माझे पती धनंजय पंडितराव मुंडेच्या म्हणण्यानुसार करत आहेत.

माझी समाजात कोणाशीही दुष्मनी नाही हे सर्व काही धनंजय मुंडे करत आहेत अगोदरपण त्याने माझ्या आईला असाच मानसिक त्रास देऊन मारलं आहे त्यामुळे मला किंवा माझ्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास धनंजय मुंडे यांच्यासह इतर पाच लोक जबाबदार राहतील यावर त्वरित कार्यवाही करावी ही नम्र विनंती.


शेअर करा