राज्यभर दौरा करून शिवभिषेक सोहळा घराघरापर्यंत पोहचणार -चंद्रकांत लबडे महाराज

शेअर करा

शेवगाव येथे 150 वा शिवभिषेक सोहळा तहसीलदार संतोष काकडे साहेब यांच्या हस्ते नुकताच पार पडला . या शिवभिषेक सोहळ्यानिमित्त शिवरायांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम करत आहे. शुक्रवारी शिव अभिषेक साजरा व्हावा हि संकल्पना लबडे महाराजांनी शेवगाव येथे महाराष्ट्रात प्रथमच साकारली असे म्हणत तहसीलदार काकडे साहेबांनी मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे यांचे अभिनंदन केले.

शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या 4 वर्षांपासून दर शुक्रवारी अखंड पणे लबडे महाराज व त्यांचे सहकारी शिव अभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. असाच शिवअभिषेक सोहळा लबडे महाराजांच्या पुढाकारातून चालु झालेले आहे तसेच प्रत्येक तालुक्यात प्रत्येक स्मारकाच्या ठिकाणी अभिषेक सुरू व्हावेत यासाठी लबडे महाराज लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

सदर शिवभिषेकास स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, विनोद ठाणगे, डॉ निरज लांडे, अमोल घोलप, पत्रकार रामनाथ रुईकर,भापकर सरपंच, सखाराम ढोरकुले,अक्षय खोमणे, शिवाजी भोसले, सुनील गवळी, डॉ योगेश फुंदे ,हरीश शिंदे, भारत दहिवाळकर,राम नेव्हल आदी उपस्थित होते.


शेअर करा