मोदी सरकार नोकरी देण्यात नव्हे तर घालवण्यात सक्षम

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत असून देशात सध्या वाढलेल्या बेरोजगारीवरून त्यांनी पुन्हा एकदा मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे नोकऱ्या देण्यात नव्हे तर नोकरी घालवण्यात सक्षम आहे , ‘ अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय रेल्वे बिगर सुरक्षा श्रेणीतील 91 हजार पेक्षा अधिक पदांची भरती भविष्यात कधीच होणार नाही अशा आशयाचे एक वृत्त आले होते. त्याच्या हवाल्याने राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केलेली असून ट्विटरवर निशाणा साधताना मोदी सरकार नोकरी देण्यात नव्हे तर घालविण्यात सक्षम आहे असे म्हटले आहे सोबतच लक्षात ठेवा हेच युवक तुमची सत्तेची घमेंड मोडतील. त्यांचे भविष्य बरबाद करणे हे सरकारला महागात पडेल असे म्हटले आहे


शेअर करा