पुणे हादरलं..’ ती ‘ डोळे झाकून विश्वास ठेवतेय म्हटल्यावर त्यांनी चक्क तिला कपडे

शेअर करा

देशातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण तर वाढलेले आहेच मात्र अनेक नागरिक जादूटोण्याचा आहारी देखील जात असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत. अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीला आली असून दोन जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष आणि अघोरी प्रथा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, धनंजय गोहाड ( राहणार मांजरी ) आणि सुरेखा जमदाडे ( राहणार गंगानगर फुरसुंगी ) अशी आरोपींची नावे आहेत. धनंजय याच्या जादूटोणा प्रकरणात सुरेखा हिने त्याला मदत केली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी यांचा एक मुलगा दिव्यांग असून जादूटोणा केल्यानंतर कुटुंबाचे चांगले होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल यासाठी दर मंगळवारी कडूनिंबाच्या पाल्याने आंघोळ घाला, त्यानंतर अकरा सोमवार दूध भात शिजवून त्याचे पिंडीला लेपण करा. काळी बाहुली दरवाजाला बांधा, यासह गुलाल उतरून टाकण्याचे देखील प्रकार आरोपीने फिर्यादी यांना करायला सांगितले आणि फिर्यादी यांनी ते केले.

फिर्यादी आपले म्हणणे डोळे झाकून ऐकत आहेत असे सांगितल्यानंतर आरोपींचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन विधीच्या बहाण्याने त्यांना चक्क विवस्त्र होण्यास भाग पाडले आणि आरोपी धनंजय याने सुरेखा हिच्या मदतीने त्यांचा विनयभंग देखील केला असे देखील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा