बायकोला आणायला गेला खरा मात्र ‘ असं काही ‘ घडेल याची कल्पनाच नव्हती

शेअर करा

बायकोला आणण्यासाठी बायकोच्या माहेरी गेलेल्या पतीला आणि त्याच्या मामाला तीन जणांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोपरगाव तालुक्यात कडेगाव येथे समोर आलेला आहे. सदर प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विजय अनिल चव्हाण हा व्यक्ती शुक्रवारी रात्री आठ वाजता आपल्या बायकोचे माहेर असलेले पढेगाव इथे तिला आणण्यासाठी त्याच्या मामासोबत गेलेला होता मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्यात वाद झाले त्यावेळी आरोपी पांडुरंग भारम भोसले, धीरज भोसले, श्याम भोसले यांनी विजय चव्हाण आणि त्याचा मामा दीपक भोसले यांना लोखंडी हत्याराने जोरदार मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मामा दीपक भोसले यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा