मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे ‘ हेच ‘ यश , बनावट नोटांचाही सुळसुळाट

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपच्या अजेंड्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत. भाजपा सरकारने घेतलेले निर्णय कसे फोल ठरले आहेत हे वारंवार उघड करत आहेत. नोटबंदीचा निर्णय हा फेल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘ देशाची अर्थव्यवस्था बुडवणे हेच मोदी सरकारच्या नोट बंदीच्या निर्णयाचे यश आहे’, अशी उपरोधिक टीका केलेली आहे.

नोटबंदी केल्यानंतर बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल तसेच नक्षलवाद, दहशतवाद असे प्रकार देखील कमी होतील असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला होता मात्र त्याची पोलखोल झालेली असून रिझर्व बँकेने आपल्या वार्षिक अहवालात पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्ये सुमारे शंभर टक्के व 50 टक्के अशी अनुक्रमे वाढ झाली असल्याचे म्हटले आहे त्यामुळे नोटबंदी करून देखील बनावट नोटा रोखण्यात सरकारला अपयश आलेले आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशातील अर्थव्यवस्था बुडवण्याचे काम मोदी यांनी नोट बंदीच्या निर्णयातून केलेले आहे. बनावट नोटांचा असलेला सुळसुळाट नोटबंदी झाल्यानंतर बंद होईल असे मोदी यांनी सांगितले होते मात्र बनावट नोटांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीच आहे त्यावर मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही ? ‘ असाही प्रश्न त्यांनी विचारला

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे रात्री टीव्हीवर येऊन नोट बंदीचा निर्णय जाहीर केला होता. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. अचानकपणे हा निर्णय घेण्यात आल्याने नोटा बदलण्यासाठी म्हणून या रांगेत उभे राहून अनेक जणांचे मृत्यू देखील झाले मात्र त्यानंतर काळा पैसा बाजारातून बाद होईल अशी अपेक्षा फोल ठरली आणि पुन्हा नव्याने बाजारात काळा पैसा मार्केटमध्ये आला. बनावट नोटा देखील पुन्हा चलनात सक्रीय झालेल्या असून नोटबंदीचे फलित काहीच झाले नसल्याचे आतापर्यंत तरी दिसून आलेले आहे तर या निर्णयाने अनेक उद्योग देशोधडीला लागले तर त्यामुळे अनेक बँकाची देणी देखील थकली आणि बँकाही अडचणीत आल्या.


शेअर करा