पुन्हा ‘ चौथी ‘ आत्महत्या , तिचा मोबाईल ताब्यात घेऊन पोलीस शोधत आहेत कनेक्शन ?

शेअर करा

पश्चिम बंगाल येथे गेल्या १५ दिवसात आत्तापर्यंत तीन प्रसिद्ध सेलिब्रिटी किंवा मॉडेल यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशातच चौथी घटना समोर आली असून आणखी एक मॉडेल कोलकत्ता येथे मयत अवस्थेत आढळून आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार सरस्वती दास असे या मॉडेलचे नाव असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय सरस्वती दास ही रविवारी कोलकत्ता शहराच्या कसबा भागात घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ती एक मेकअप आर्टिस्ट देखील होती मात्र तिने हे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. सरस्वती हिची आजी यांनी पहिल्यांदा तिला गळफास घेतलेले पाहिले आणि त्यानंतर तिला दवाखान्यात नेण्यात आले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.

गेल्या काही दिवसात मॉडेल मंजुषा नियोगी, विदिशा डे, पल्लवी डे यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहे सदर प्रकरणी या मॉडेलचा देखील या आत्महत्येशी काही संबंध आहे का ? याचा पोलीस तपास करत आहेत. सरस्वती हिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्याच्या आधारे तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा