संगमनेर तालुक्यात प्रवरेच्या कालव्यात विवाहितेचा मृतदेह, माहेरचे व्यक्ती म्हणतात की ?

शेअर करा

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शिबलापुर येथे एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून परिसरातील रहिवासी असलेल्या आरती राजेंद्र मूनतोडे ( वय 35 ) या महिलेचा मृतदेह आश्वी खुर्द येथे प्रवरेच्या कालव्यात आढळून आलेला आहे. सदर महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय माहेरच्या व्यक्तींनी व्यक्त केला असून पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती.

उपलब्ध माहितीनुसार, सोमवारी 30 तारखेला सकाळी साडेसातच्या सुमारास प्रवरेच्या कालव्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सुभाष भोईर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर हा मृतदेह सापडल्याची माहिती माहेरच्या व्यक्तीना समजल्यानंतर त्यांनी आश्वी पोलिस ठाणे गाठले.

महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळींवर खुनाचा संशय माहेरच्या व्यक्तींनी व्यक्त केला आणि अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह सासरी आणण्यात आल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यविधी घरात करण्याची मागणी केली त्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक सुभाष भोईर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी परिस्थितीचे भान ठेवत योग्यरीत्या विषय हाताळत हा अंत्यविधी पार पडला.

सदर प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात महिलेचा पती राजेंद्र मुंतोडे, दीर रवींद्र मुंतोडे, जाऊ बाई रंजना मुंतोडे, सासु अलका यशवंत मुंतोडे ( सर्वजण राहणार शिबलापुर तालुका संगमनेर ) यांच्यासह नणंद शीला गायकवाड आणि तिचा पती प्रकाश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सहाही जणांना ताब्यात घेतले असून पोलिस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा