श्रीरामपूर तालुक्यातील दिघी रोडवर बिबट्याचा धुमाकूळ, मोटारसायकल दिसली अन ..

शेअर करा

नगर जिल्ह्यात पाथर्डी पाठोपाठ श्रीरामपूर जिल्ह्यात देखील बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून श्रीरामपूर तालुक्यातील दिघी रोडवरील साबळे वस्तीवर उध्दव साबळे व त्यांची पत्नी यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 8 ते 8.30 या दरम्यान घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात उद्धव साबळे व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत.

याच बिबट्याने काही वेळाने दिघी रोडवर आपल्या घरी जात असलेले विजय कुमार दुधे यांच्या मोटारसायकलीचा 50 ते 60 फुटांपर्यंत पाठलाग केला. मात्र दुधे यांच्या सोबत अजून दोन व्यक्ती असल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन धुम ठोकली.

सध्याला पाटाला पाणी आल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी राञंन दिवस एक करीत आहे. गेल्या आठ दिवसापासुन ह्या बिबट्याने अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिले असून शेतकऱ्यांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.


शेअर करा