पुण्यातील पेठेत ‘ तसल्या ‘ मोहापायी जाणे अंगलट, रात्रभर तरुणाला डांबून ..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका बँकेत काम करत असलेल्या एका तरुणाला शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून लुबाडण्यात आलेले आहे. पीडित विद्यार्थी मूळचा सांगलीचा असून तो एमबीएच्या दुसर्‍या वर्षात तो शिकतो. फेसबुकवरील एका मित्राने त्याला शरीर संबंध ठेवण्याची ऑफर दिली आणि तो गुरूवार पेठेतील एका घरात गेला. तिथे पोहचल्यानंतर आणखी चार जण तिथे पोहचले आणि पीडित तरुणाचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल ५५ हजार लुटले.

उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा मुळचा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील असून तो एमबीएच्या दुसर्‍या वर्षाला शहरातील एका कॉलेजमध्ये शिकतो आणि एका बँकेचे काम देखील करतो . तब्बल ६० हजार रुपये महिना कमवत असताना ‘ हा ‘ मोह त्याला भलत्याच भावात पडलेला आहे. त्याला फेसबुकवर साहिल कुरेशी नावाच्या व्यक्तीची फेसबुक रिक्वेस्ट आली होती आणि त्यांनी एकमेकांसोबत बोलायला सुरु केले आणि नंबर देखील शेअर केले. २८ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास कुरेशी याने तरुणाला शरीरसंबंध ठेवायचे आहेत का ? असे विचारले आणि या तरुणाला गुरुवार पेठ इथे एका खोलीवर बोलावून घेतले.

तरुण तिथे गेला आणि त्यावेळी आणखी तीन जण गाडीतील पेट्रोल संपले आहे असा बहाणा करत खोलीत घुसले. कुरेशी व इतर तीन अशा चौघा आरोपींनी दमदाटी करून तरुणाकडे पैशाची मागणी केली आणि आरोपींनी तरुणाचा व्हिडीओ काढत तो गे असल्याचे दाखवून संबंधीत व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच ठार मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या मोबाईलचा पासवर्ड दमदाटी करून विचारत ५५ हजार रुपयांना लुटले.

साहिल कुरेशी,अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे असून कुरेशी व जाधव हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते तर पीडित युवक हा वडगाव शेरी (मुळ. इस्लामपुर, सांगली) येथील रहिवासी असून त्याचे वय २४ वर्षे आहे. रात्रभर आरोपींनी त्याला डांबून ठेवले आणि पैसे काढून घेतल्यावर सकाळी सात वाजता त्याला सोडून दिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहूल खंडाळे करीत आहेत.


शेअर करा