लग्न तर नाही करायचं पण नवरी तर व्हायचंय ? गुजरातच्या क्षमाबेनने ‘ तिढा ‘ असा सोडवला

शेअर करा

प्रगतीशील राज्य म्हणून ओळख बनवू पाहणाऱ्या गुजरातमध्ये एक वेगळीच घटना समोर आलेली असून वडोदरा येथे राहणारी क्षमा बिंदू नावाची एक तरुणी लग्न करणार आहे मात्र या लग्नासाठी नवरदेवच नाही असा हा प्रकार आहे. क्षमा हिचे वय 24 वर्षे असून ही चक्क स्वतःशीच लग्न करणार आहे. तिच्या घरचे देखील मोठ्या मनाचे असून त्यांनीच आपल्याला अशा स्वरूपाच्या लग्नाला मान्यता दिली असेही पुढे ती म्हणते.

क्षमा हिच्या म्हणण्यानुसार, मला लग्न करण्याची कधी इच्छा नव्हती मात्र वधू व्हावे असे माझे स्वप्न होते होते त्यामुळे मी इंटरनेटवर स्वतःशीच लग्न करू शकते का यासंदर्भात शोध घेतला आणि त्यामध्ये सोलो वेडिंग हा प्रकार मला समजला. घरच्यांना माझ्या या निर्णयाबद्दल मी माहिती दिली असता त्यांनी मोठ्या मनाने माझ्या निर्णयाचे स्वागत केले, असेही पुढे म्हणते म्हणते. आई वडिलांनी मला या निर्णयाला पाठिंबा दिला असे सांगत क्षमा दोन आठवडे गोवामध्ये हनीमूनसाठी जाणार आहे.

स्वयम् विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवरच प्रेम करण्याची वचनबद्धता आहे यामध्ये वधू आणि वर हा एकच व्यक्ती असतो कदाचित देशातील ही पहिलीच घटना असावी अशी देखील चर्चा आहे. शमा म्हणते की ‘ माझे स्वतःवर प्रेम आहे म्हणून मी स्वतःशीच लग्न करत आहे ‘


शेअर करा