महाराष्ट्र हादरला..अखेर ‘ त्या ‘ हत्याकांडातही पुन्हा आईच निघाली खुनी

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात घडली उघडकीला आली आहे. एका निर्दयी मातेने पोटच्या दोन मुलांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह जाळून टाकल्याचा प्रयत्नही केला. भोकर तालुक्यातील पांडुरना येथे घटना घडलेली असून सदर घटनेविषयी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या पाच दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात एका महिलेने सहा मुलांना विहिरीत फेकून त्यांचा जीव घेतला होता त्यानंतर ही घटना उघडकीला आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पांडुरना येथील धुरपताबाई गणपत निमलवाड (वय ३० ) असे या निर्दयी महिलेचे नाव असून तिने 31 तारखेच्या रात्री पोटचा मुलगा दत्ता ( वय दोन वर्ष ) त्याला तोंडात माती भरून मारून टाकले आणि त्याचा मृतदेह शेतातील एका उसाच्या शेतात फेकून दिला त्यानंतर देखील तिने पुन्हा चार महिन्याची अनुसया या मुलीला देखील मारून टाकले आणि तिचा मृतदेह एका नाल्याजवळील खड्ड्यात नेऊन टाकला आणि तो जाळण्याचा देखील प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे तिची आई कोंडाबाई आणि तिचा भाऊ माधव राजेमोड यांनी देखील तिला या कामात मदत केली.

पत्नी आणि मुले दिसत नसल्याने तिचा पती गणपत यांनी आणि त्याच्या वडिलांनी शोध घेतला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. निर्दयी आई धुरपताबाई, तिची आई कोंडाबाई आणि तिचा भाऊ माधव राहणार ( ब्राम्हणवाडा तालुका मुदखेड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तीनही आरोपींना जेरबंद करण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहेत.


शेअर करा