एकीकडे पोलिसात तक्रार तर दुसरीकडे बायको चुलत सासऱ्याबरोबर ,’ रहस्य ‘ उलगडले

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नटवाडे इथे एका व्यक्तीची पत्नी गायब झाली होती. तपास सुरु असताना ती तिच्या चुलत सासऱ्यासोबत पळून गेल्याचे पतीच्या लक्षात आले आणि संतप्त झालेल्या पतीने तिचा शोध घेतला आणि तिचा खून केला. पोलिसांनी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी 24 तासांत बेड्या ठोकल्या असून खुनाची कबूली दिली आहे. सुनिल रुलसिंग पावरा असे आरोपी पतीचे नाव असून निर्मला पावरा असे हत्या करण्यात आलेल्या मृत पत्नीचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुनील पावरा याने 13 मे रोजी त्याची पत्नी निर्मला पावरा ही बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिली होती आणि एका बाजूला तो पत्नीचा शोध घेत होता तर पोलिसही तपास करत होते मात्र याचदरम्यान सुनील याला 29 मे रोजी पत्नी ही चुलत सासऱ्यासोबत पळून जाऊन कन्नड घाटाजवळ एका झोपडीत आपल्या काकासोबत राहत आहे, अशी माहिती हाती लागली आणि तो लगेचच त्याठिकाणी गेला. तिथे गेल्यावर त्याने गोड बोलून पत्नीला ‘झाले गेले ‘ विसरून माझ्यासोबत चल असा आग्रह केला आणि पत्नी तयार झाली.

दुसऱ्या दिवशी ३० तारखेला रात्री कन्नड येथून येत जाताना करवंद ते नटवाडे गावात जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या चारीमध्ये पत्नी निर्मला हिच्या डोक्यात दगड टाकून ठेचून सुनीलने तिचा खून केला. ती मयत झाल्यावर तिची ओळख पटू नये म्हणून त्याने हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी निर्मलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिच्या शरीराला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळून घरी निघून गेला.

31 मेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावातील पोलीस पाटील प्रकाश पावरा यांनी ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर काही वेळात महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. चौकशीसाठी पती सुनील याला ताब्यात घेण्यात आले असताना त्याने चुलत सासऱ्याशी तिचे अनैतिक संबंध होते म्हणून राग मनात धरून या महिलेची हत्या केली अशी कबूली दिली आहे.


शेअर करा