‘ पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी सत्तेच्या जोरावर.. ‘ , काय म्हणाले सुजय विखे ?

शेअर करा

खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी टाकळी ढोकेश्वर जवळील वासुंदे इथे पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यात असलेल्या सत्तेच्या जोरावर महसूल आणि पोलिस प्रशासनाचा गैरवापर करत असून तालुक्यातील शिवसेना भाजप तसेच विरोधातील कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र करत आहेत. हा लोकशाहीवर आघात आहे त्यामुळे पारनेर तालुक्यातील सुज्ञ जनता त्यांना धडा शिकवेल असे म्हटलेले आहे.

वासुंदे येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे बोलत होते ते म्हणाले की, ‘ केवळ मतांसाठी राजकारण न करता आपण जनतेच्या हितासाठी राजकारण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे आपण काम करत आहोत.

कार्यक्रमाच्या वेळी या ठिकाणी युवा नेते सुदेश झावरे पाटील, ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी सर, विश्वनाथ कोरडे, राहुल पाटील, तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .


शेअर करा