सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई धमक्या नक्की का देतोय ?

शेअर करा

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवारी सकाळी धमकीचे पत्र मिळाले असून त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी बांद्रा येथील बसस्टॅन्ड जवळ असलेल्या नेहमीच्या बाकड्यावर बसलेले असताना तिथे त्यांना हे पत्र मिळाले असून असून त्यामध्ये ‘ सलमान खान आपका बहुत जल्द मुसेवाला होगा,’ अशी धमकी देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांनी तात्काळ सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला आणि आपला जबाब नोंदवला.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भा द वि 506 2 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला यांची काही दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. याप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई याचा हात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सलमान खान याने बिष्णोई समाजातील पवित्र असलेल्या काळविटाची शिकार केल्याचे प्रकरण समोर आले होते तेव्हापासून त्या समाजातील असलेला लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खान याला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सदर प्रकरणी या पत्राचा पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा