औरंगाबाद हादरलं..आंतरधर्मिय प्रेमाच्या दुसऱ्या विवाहाचा ‘ वेगळाच ‘ शेवट

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आलेले असून पन्नास वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असलेल्या पतीने घरातील दगडी खलबत्ता तिच्या डोक्यात घालत तिचा खून केलेला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना राहुल नगर येथे घडलेली असून तिच्या मृतदेहाच्या शेजारी मोबाईल ठेवून आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून वृत्त लिहीपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही.

उपलब्ध माहितीनुसार, मच्छिंद्र पिराजी पिटेकर ( वय 55 राहणार राहुल नगर) असे पतीचे नाव वाचून त्याची पत्नी बिल्किस उर्फ मीना ( वय 50 ) असे तिचे नाव आहे. मीना तिची मुलगी शमा शेख हिने यासंदर्भात फिर्याद दिली असून त्यामध्ये मच्छिंद्र हा सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता म्हणून आपण वडिलांना समजून सांगितले मात्र त्यानंतर देखील त्यात बदल झाला नाही असे म्हटले आहे.

मुलगी शमा हिच्यासोबत बिल्किस या एकाच हॉटेलवर काम करत होत्या. आईला घेण्यासाठी त्या आईच्या घरी गेलेले असताना घराला कुलूप होते आणि हॉटेलमध्ये देखील त्या आढळून आल्या नाहीत. त्यांनी त्यांची मुलगी असलेली मुस्कान हिला कुलूप तोडून घरात डोकावून पाहण्यास सांगितले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बिल्किस यांचा हा दुसरा विवाह असून प्रेमविवाह केल्यानंतर देखील संशयी पतीने पत्नीचा खून केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे .


शेअर करा