सोनारबाबाच्या खोलीतील ‘ तसला ‘ प्रकार पाहून आई देखील हादरली तर बाबाचा मृत्यू

शेअर करा

नगर शहरानजीक बोल्हेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून सहा तारखेला रात्री पावणेनऊच्या सुमारास बोल्हेगाव येथे आईकडून पैसे घेऊन दुकानात गेलेल्या एका अल्पवयीन चार वर्षीय मुलाला घरात बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे . सदर प्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली मात्र संतप्त जमावाने या घटनेनंतर आरोपीला जोरदार मारहाण केली आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, राजेश काशिनाथ सोनार उर्फ सोनारबाबा ( वय 55 राहणार भेंडा तालुका नेवासा राहणार बोल्हेगाव नगर ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मुलाच्या आईने यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचा चार वर्षीय मुलगा रात्री पावणेनऊच्या सुमारास दुकानात गेला होता त्यावेळी परिसरात सोनारबाबा नावाने परिचित असलेल्या या व्यक्तीने त्याला घरात बोलावले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला .एकीकडे आई वाट पाहत होती तर दुसरीकडे सोनार बाबा त्याच्यावर अत्याचार करत होता.

बराच वेळ झाला तरी मुलगा परत आला नाही म्हणून मुलाच्या आईने चौकशी केली असता परिसरातील नागरिकांनी सोनारबाबा त्याला आपल्या घरात घेऊन गेलेला आहे असे लक्षात आल्यावर महिलेने दरवाजाच्या फटीतून डोकावले असता हा संतापजनक प्रकार समोर आला. आपल्याला पकडल्याचे लक्षात आल्यानंतर या बाबाने दरवाजा उघडून मुलाला बाहेर फेकले आणि दरवाजा लावून घेतला त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बाहेर काढत जोरदार चोप दिला त्यात तो जखमी झाला होता.

सदर प्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम 377 आणि पॉक्सो अंतर्गत या सोनार बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला मारहाण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नागरिकांनी केलेल्या जोरदार मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे असून सदर प्रकरणी तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा