कौतुकास्पद ..बहिणींनी दिला भावाला खांदा तर मुलीने दिला अग्निडाग

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच मात्र कौतुकास्पद घटना समोर आलेली असून भाऊ मयत झाल्यानंतर त्याला मुलगा नाही अशा परिस्थितीत चक्कर बहिणीनी समोर येत आपल्या भावाला खांदा देत त्याच्या मुलीच्या हाताने अग्निडाग दिलेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील सुदाम रामा नेटके ( वय 45 ) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते त्यानंतर त्यांना खांदा कोण देणार असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र त्यांना मुलगा नसल्याने सुदाम यांच्या बहिणींनी आपल्या भावाला खांदा दिला तर सतरा वर्षाची मुलगी दर्शना हिने वडिलांना अग्नीडाग देत त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण केले. सुदाम नेटके हे गेल्या वीस वर्षांपासून आजारी होते. ऐन तरुणाईत त्यांना अर्धांगवायू आल्याने त्यांचे कुटुंबीय या आजारातून कधीही सावरले नाही मात्र घराचा सर्व भार त्यांचे वडील रामा नेटके यांनी उचलला होता.

आई पत्नी आणि मुलगी यांनी अखेरपर्यंत त्यांची सेवा केली मात्र सुदाम यांचे अखेर निधन झाले. सुदाम यांना मुलगा नसल्याने त्यांची बहीण लता बाविस्कर, मंगला वानखेडे आणि उषा सुरवाडे यांनी भावाला अखेरच्या प्रवासात साथ देत अंत्यसंस्काराच्यावेळी तिरडी खांद्यावर घेतली. सुदाम यांना एकच मुलगी असल्याने तिने देखील मुलीचे कर्तव्य पार पाडत वडिलांना अग्निडाग दिला.


शेअर करा