पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे उघडकीला आलेले आहे एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिला तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्यात आले तसेच समोरील व्यक्तीने आरोपीने तिची दीड लाखांची फसवणूक केली असा प्रकार उघडकीला आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, बाणेर परिसरात ही घटना सुमारे दोन वर्षे घडलेली असून पीडित महिलेचे वय 37 वर्षे असल्याचे समजते. हिंजवडी पोलिस ठाण्यात महिलेने सोमवारी दाखल होऊन फिर्याद नोंदवली असून दोन आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आलेली आहे तर एक फरार आहे. परिक्षित सुभाष पाटील ( वय ४३ राहणार धायरी पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे समजते.
फिर्यादी आणि आरोपी हे दोघे खाजगी सिक्युरिटी एजन्सी चालवतात त्यामध्ये त्यातून त्यांची एकमेकासोबत ओळख झाली होती त्यानंतर जुलै 2019 मध्ये आरोपीने फिर्यादी हिला कामाचे बोलायचे आहे असे सांगत परिसरातील एका लॉजवर नेले आणि त्यानंतर तिला गुंगीचे औषध देत तिच्यावर प्रथम अत्याचार केला.
एकदा हा प्रकार झाल्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा मार्च 2021 मध्ये महिलेला तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा लॉजवर बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला याच दरम्यान फिर्यादी यांनी पुरवलेल्या सिक्युरिटीचे आरोपीकडून जवळपास दीड लाख रुपये येणे होते मात्र आरोपीने ते पैसे दिले नाहीत त्यामुळे महिलेला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने पोलिसात धाव घेतली.