नगर ब्रेकिंग..’ ताईंना डावललं ‘ म्हणत पाथर्डीत मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांनी घेतले विष

शेअर करा

माजी मंत्री व जनसामान्यातील नेतृत्व असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील कट्टर मुंडे समर्थक असलेले मुकुंद गर्जे यांनी चक्क विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांना आधी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, मुकुंद गर्जे यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने चक्क शेतीसाठी वापरले जाणारे रोगर हे किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे . पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात असल्याचा आरोप केला जात असून याआधी देखील ‘ आमच्या ताईला डावलतो ‘ असे म्हणत देवेंद्र नावाच्या व्यक्तीशी शिवीगाळ करत असलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेला उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे समर्थक संतापले असल्याचे दिसून येत असून पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवण्याचे हे षडयंत्र असल्याचा देखील आरोप कार्यकर्ते करत आहेत आणि अशातच पाथर्डी तालुक्यातील पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याने प्रकरणाने वेगळंच वळण घेतलेलं आहे.


शेअर करा