ग्राऊंड रिपोर्ट : ‘ शिवभोजन थाळी ‘ च कसं काय चाललंय ?

शेअर करा

राज्य सरकारची सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची असलेली शिवभोजन थाळी नागरिकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून राज्य सरकारच्या वतीने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत तब्बल दहा कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आहे. योजना सुरू झाल्यापासून तर आत्तापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त नागरिकांच्या पोटाची भूक भागविण्यात शिवभोजन थाळी संजीवनी ठरलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत थाळीसाठी १० रुपये द्यावे लागत असून दोन पेक्षा अधिक चपाती घेतल्यास त्याचे अधिक १० रुपये आकारण्यात येत आहेत तर भाजी मात्र मोफत आहे. कोरोना काळात शिवभोजन थाळी मोफत दिली जात होती.

सध्याच्या परिस्थितीत राज्यात १५२८ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने केलेले नियोजन आणि उत्तम अन्न दर्जा असलेले अन्न यामुळे अनेक नागरिक देखील सरकारच्या या महत्त्वकांक्षी योजनेचा लाभ घेत असून अत्यल्प दरात चांगले अन्न उपलब्ध होत असल्याने राज्य सरकारला गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत.

शिवभोजन केंद्रावर परिणामकारक नियंत्रण राहावे म्हणून सीसीटीव्ही यंत्रणा तसेच जेवणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा फोटो केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन पोर्टलला सबमिट करावा लागतो त्यामुळे सदर योजनेत अफरातफरी होण्याचे प्रमाण अद्यापपर्यंत तरी दिसून येत नाही तर ग्राहकांसाठी देखील तक्रार नोंदवण्याची देखील सुविधा असल्याने सदर योजनेचा कारभार उत्तमरितीने सुरू आहे मात्र शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या चालकांना अनुदान मिळण्यासाठी दुर्दैवाने जास्त वाट पहावी लागते त्यावर अधिक काम करण्याची गरज आहे.


शेअर करा