आपल्यात ‘ तो ‘ नकोच , प्रियकराला महिलेने घरी बोलावले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आलेली असून अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या केली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आणि चक्क आरोपी पत्नीला तिच्याच अल्पवयीन मुलाने सुद्धा या कामात मदत केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेल्या भुमराळा गावात आरोपी महिलेने आपला अल्पवयीन मुलगा आणि प्रियकर असलेला व्यक्ती ज्ञानदेव आघाव या दोघांच्या मदतीने पती रामदास सरकटे याची हत्या केली. प्रियकराच्या मदतीने तिने पतीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर फिल्मी स्टाईलने पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

रामदास सरकटे यांच्या बायकोचे प्रियकर ज्ञानदेव आघाव याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सदर प्रकरणी कुणकुण रामदास यांना लागल्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले आणि पत्नीने चक्क स्वतःच्या अल्पवयीन मुलाला हाताशी घेतले आणि प्रियकराला देखील मदतीला घेतले आणि पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकला मात्र पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत या संपूर्ण घटनेचा छडा लावला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .


शेअर करा