करंजी घाटात गाडीचा वेग कमी झाला अन अचानक पाठीमागून ..

शेअर करा

पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात असलेल्या माणिक पीर बाबा दर्गा येथील धोकादायक वळणावर एका ट्रक चालकाला जबर मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना उघडकीला आली असून ट्रकचालक असलेले किसन नवनाथ मराठे ( राहणार मराठवाडी तालुका आष्टी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपण घाटातून जात असताना मानिक पीर बाबा दर्गा जवळ असलेल्या वळणाजवळ तीन जण पल्सर गाडी वरून आले आणि त्यांनी त्यांची पल्सर गाडी आडवी लावली. त्यातील दोन जणांनी ट्रकमध्ये चढुन गचांडी धरून चाकूने वार करत खाली पाडले आणि लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून सव्वीस हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तक्रार दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलिसांनी करंजी येथील दोन संशयित व्यक्तींना अटक केलेली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. करंजी घाटात गाड्यांचा वेग कमी असल्याने अनेकदा या आधी देखील मोटर सायकल स्वार यांना देखील लुटण्याचे प्रकार घडलेले आहे त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून घाटामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी करण्यात येत आहे.


शेअर करा