पुणे हादरलं.. ‘ इथे चांगले लोक नाहीत ‘ म्हणत त्याने जोडप्याचा विश्वास मिळवला अन..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे रोजगाराच्या भरपूर संधी असल्याने देशभरातून अनेक जण नोकरीच्या शोधात येत असतात. अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क आल्यानंतर बाहेरील व्यक्ती असल्याचे हेरून त्यांची फसवणूक तर केली जातेच पण अनेकदा त्याच्याही पुढे जात अनेक घटना घडतात.अशीच एक घटना स्वारगेट बसस्थानक येथे घडलेली असून पतीसोबत आलेली एक महिला चक्क वासनांध व्यक्तीची शिकार बनलेली आहे. आरोपीने आधी मदतीचा हात पुढे केला मात्र पती लघुशंकेला गेला आणि त्याची नियत बदलली. त्याने टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आराम करत असलेल्या महिलेला तशीच गाडी पळवून कात्रज बस स्टॉपसमोर कॅनॉलच्या फुटपाथवर तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पलायन केले.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला आणि पती यांनी 1 वर्षापूर्वी घरातून पळून जाऊन लवमॅरेज केलेले आहे. दोघेही एका हॉटेलमध्ये परगावी काम करत होते मात्र पुण्यात ते रोजगाराच्या शोधात आले होते. कात्रज चौकातील एका खानावळीत त्यांनी काम केले आणि त्यानंतर निवारा शोधत शोधत ते स्वारगेट येथील बस स्थानकावर आराम करत होते.

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नवनाथ भोंग याने रस्त्यालगत तुम्ही आराम करू नका, इथे चांगले लोक नाहीत असे सांगत त्यांना टेम्पो ट्रॅव्हलमध्ये आराम करण्यास सांगितले आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास पतीला लघुशंका आल्याने तो ट्रॅव्हलर चालकास सोबत स्वारगेट बसस्थानक येथील स्वच्छतागृहात गेला त्यावेळी तो आत गेल्याची संधी साधत भोंग हा पुन्हा बाहेर आला आणि त्याने महिलेसोबत गाडी घेऊन पलायन केले आणि महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिला ढकलून देत तो फरार झाला.

पती परत आला असता त्याला पत्नी आढळून आली नाही. त्याने शोधाशोध सुरू केल्यानंतर काही वेळाने पत्नी त्याच्या निदर्शनास आली आणि तिने आरोपी भोंग याने केलेल्या कुकर्माची माहिती दिली त्यानंतर पहाटे पाच वाजता स्वारगेट पोलिस ठाण्यात पती-पत्नीने दाखल होत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि अवघ्या काही तासात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. आरोपी चालक हा प्रवासी वाहतूक करणारा असून पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा यामुळे ऐरणीवर आलेला आहे.


शेअर करा