‘ भकासपर्व ‘ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करणार , ‘ संग्रामपर्व ‘ ला उत्तर ?

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत असले तरी नगर शहरात मात्र वेगळेच राजकीय समीकरण असून आमदार संग्राम जगताप यांच्या कारकिर्दीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ‘ संग्रामपर्व ‘ नावाच्या एका पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र त्याला उत्तर म्हणून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ‘ भकासपर्व ‘ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसकडून करण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे.

किरण काळे यांनी नगर शहरातील एमआयडीसीची दुरवस्था, शहरात वाढत असलेली बेरोजगारी, विस्कळीत झालेली बाजारपेठ, नगर शहरातील खड्डे, शहरातील अनेक भागांमध्ये पथदिव्यांच्या अभावी पसरलेला अंधार तसेच शहरात अनेक ठिकाणी आठ-आठ दिवस नळाला न येणारे पाणी यामुळे नगरकरांचा जीव मेटाकुटीला आलेला असताना संग्राम जगताप यांच्या ‘ संग्रामपर्व ‘ ला यापुढे ‘ भकासपर्व ‘ च्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल असेही ते म्हणाले.