सायबर अलर्ट..देशातील सरकारी वेबसाईट्स हॅकर्सच्या निशाण्यावर का ?

शेअर करा

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एकीकडे जगभरात भारताच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचत आहे आहे तर दुसरीकडे देशातील सरकारी वेबसाईट्सवर देखील सायबर हॅकरने हल्ला केलेला आहे आत्तापर्यंत सुमारे ५०० हून अधिक वेबसाईट हॅकर्सच्या निशाण्यावर आलेल्या असून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राची तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती असलेली वेबसाईट ही हॅक करण्यात आली आहे त्यानंतर ही वेबसाइट आठ तास बंद होती.

सायबर हॅकरने ही वेबसाईट हॅक केल्यानंतर त्यावर ‘ जगभरातील मुस्लिमांची माफी मागा नाही तर आम्ही गप्प बसणार नाही ‘ असा इशारा दिलेला स्क्रीनशॉट होमपेज वर टाकण्यात आलेला होता. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास ही वेबसाईट हॅक झाली आणि त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता वेबसाईट पुन्हा पूर्ववत करण्यात आली. वेबसाईटवरील कुठलाही डाटा नष्ट करण्यात आलेला नाही मात्र यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मियांसाठी असलेले आदरस्थान प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली मात्र दुसरीकडे काही जणांकडून नुपूर शर्मा यांना पाठिंबा वाढत असल्याने तसेच भाजपच्या काही नेत्यांकडून देखील त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आल्याने सत्ताधारी भाजप पक्षाच्या विरोधात जगभरात रोष वाढतो आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून उपाय योजनांच्या बाबतीत यंत्रणा काम करत आहेत असे सांगितले आहे तसेच राज्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नुपूर शर्मा यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, कारवाई देखील सुरू आहे मात्र आता याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे देशाच्या पंतप्रधानांनी ठरवले पाहिजे, ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा