रोहित पवारांनाही भावनिक राजकारणाचा मोह आवरेना , नक्की काय चाललंय ?

शेअर करा

नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न जसे रस्ता लाईट पाणी शिक्षण आणि महागाई या मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवत नागरिकांच्या भावनांना हात घालत वेगळेच विषय हाती घेण्याचा मोह आता आमदार रोहित पवार यांना देखील झालेला असून त्यांनी आणलेल्या गंगाजलाने तीर्थस्थानाना अभिषेक करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाची सुरुवात नुकतीच कर्जत येथील संतश्री सद्गुरू गोदड महाराज मंदिरातून करण्यात आलेली आहे.

रोहित पवार यांच्या या उपक्रमात महाराष्ट्राच्या विविध भागातील धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी पोहोचून गंगाजलाचा अभिषेक करण्यात येणार आहे. आणलेल्या या गंगाजलाचे कलश तयार करून अध्यात्मिक स्थळी ते पाठवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी धार्मिक स्थळे यांची यादी करण्यात आलेली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात वीज संकट, पाणी संकट यासह बेरोजगारी देखील वाढत असून त्यामुळे नागरिकांचे देखील अर्थचक्र बिघडलेले आहे अशा परिस्थितीत नागरिकांच्या भावनांशी संबंधीत असे विषय हाती घेत नागरिकांच्या मूळ प्रश्नांना फाटा देण्याचा तर प्रयत्न होत नाही ना ? अशी देखील चर्चा यानंतर सुरू झालेली असून रोहित पवार यांचा हा उपक्रम भाजपच्या पावलावर पाऊल टाकून तर सुरू नाही ना ? अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तर हिंदू म्हणजे काही केवळ भाजपचाच मुद्दा नाही त्यामुळे त्यांना अनेक नागरिकांचे समर्थन देखील मिळत असल्याचे दिसून येत आहे .


शेअर करा