कारागृहाच्या कैद्यांना गांजा पोहचवण्यासाठी केली ‘ वेगळाच ‘ प्रयोग , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

कारागृहात असलेल्या अनेक कैद्यांना वेगवेगळी व्यसने असतात त्यामध्ये गांजाचे व्यसन देखील अनेक कैद्यांना असते. कारागृहात गांजा उपलब्ध होत नसल्याने गांजा कारागृहात कसा न्यायचा याची चिंता असल्याने एका अज्ञात व्यक्तीने वाशिम जिल्हा कारागृहाची सुरक्षा भेदत एक रबरी चेंडू गांजा भरून पोहोचेल अशा बेताने कारागृहाच्या आवारात फेकला. गुरुवारी ही घटना घडलेली असून कारागृहातील कर्मचाऱ्यांनी हा चेंडू ताब्यात घेतलेला आहे.

वाशिम जिल्हा कारागृह परिसरात कडेकोट बंदोबस्तात असताना देखील ही घटना घडल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृहाच्या चारही बाजूंनी उंच अशा भिंती असल्याने प्रवेश करणे अशक्य आहे त्यामुळे कारागृहात असलेल्या कैद्यांना चेंडूच्या माध्यमातून गांजा पुरवण्याचा प्रयत्न झाले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून 14 ग्रॅम गांजा भरलेला रबरी चेंडू जप्त केला असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


शेअर करा