महाराष्ट्रात अग्निपथ योजनेच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन पेटण्याचे संकेत , प्रशासन अलर्टवर

शेअर करा

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध वाढत चाललेला पहायला मिळत आहे. सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला यावरून धारेवर धरलेले आहे. काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी देखील या योजनेला कडाडून विरोध केला असून आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि या योजनेवर भाष्य केलं. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या नव्या योजनेवर कन्हैया यांनी टीका केली आहे. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन होत आहे. यात सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे मात्र तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं ”, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सध्या आणखी धारदार होत आहे. अश्यातच आता राज्यातही याची धग जाणवू लागली आहे. युवक राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा युवक राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे .

भूमी अधिग्रहण कायदा यानंतर काळे कृषी कायदे या पाठोपाठ आता देशभरात केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर देशातील अनेक राज्यांमधून विरोध तीव्र होत असल्याचे पहायला मिळत आहे. बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी आत्तापर्यंत 12 रेल्वे पेटून दिलेल्या असून आत्तापर्यंत हे आंदोलनाचे लोण १२ राज्यात पसरलेले आहे. बिहारसोबतच उत्तर प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात तीव्र निदर्शने करण्यात आलेली आहेत.

आंदोलक रस्त्यावर उतरल्याने देशाच्या अनेक भागात दोनशे रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे विरोधक आणि आंदोलक यांची बाजू ऐकून न घेता अग्नीपथ योजनेत सहभागी होण्याची कमाल मर्यादा वाढवली आहे म्हणून त्याचा तरुणांना फायदा होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, असा युक्तिवाद गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून करण्यात आलेला आहे .

बिहारच्या नवाडा इथे अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांच्या जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला करत ते पेटवून दिले आहे. नवाडाच्या अटुआ येथील भाजप कार्यालयाला आग लागली आहे. हजारो संतप्त आंदोलकांनी भाजपचे कार्यालय पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप कार्यालयाच्या दोन्ही मजल्यांना आग लागली असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.

केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली असून या योजनेला देशातील वेगवेगळ्या भागातून विरोध होत आहे. बिहार तसेच इतर राज्यांत या योजनेविरोधात जोरदार निदर्शने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी अग्निपथ या योजनेचा विरोध केला असून तरुणांच्या भविष्याशी खेळू नका असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे तसेच जबाबदारी झटकून टाकणाऱ्या या योजनेबद्दल जोरदार टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, “दोन वर्षांपासून सरळ भरती करण्यात आलेली नाही. चार वर्षानंतर युवकांचे भविष्य अस्थिर होईल. तसेच या काळात कोणताही रँक मिळणार नाही. तसेच कोणतेही पेंशनदेखील मिळणार नाही. सरकारकडून संरक्षण दलाच सन्मान केला जात नाही. देशातील बेरोजगार युवकांचे म्हणणे ऐकायला हवे. त्यांना अग्निपथावर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊन नका, असा इशारादेखील राहुल गांधी यांनी दिला आहे.

अवघ्या साडे सतराव्या वर्षी भरती आणि आणि त्यानंतर चारच वर्षात पुन्हा रिटायरमेंट यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होणार असून तात्कालिक स्वरूपाच्या या चार वर्षाच्या फायद्याचे आम्ही काय करायचे ? यामुळे शिक्षण तर होणार नाही आणि नोकरीतून कमी केल्यानंतर पुन्हा बेरोजगार व्हायचे का ? असा प्रश्न विचारत युवकांकडून बारा राज्यात आंदोलन सुरु आहे.

तिन्ही सैन्यदलात फक्त चार वर्षांसाठी केल्या जाणाऱ्या या भरतीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून अवघ्या चार वर्षात रिटायरमेंट घेऊन आम्ही काय करायचे असा प्रश्न विचारत जुन्याच पद्धतीने लष्कर भरती सुरू ठेवा जेणेकरून सरकारला देखील आपल्या जबाबदारीची जाणीव राहील आणि लष्करासाठी असलेल्या पेन्शन तसेच इतर सुविधांचा देखील जवानांना लाभ घेता येईल अशी मागणी केली आहे.

अवघ्या साडे सतराव्या वर्षी लष्करात भरती केल्यानंतर या जवानांना ‘ अग्नीवीर ‘ अशा गोंडस नावाने ओळखले जाणार असून चार वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर विचार करून त्यांना सीआरपीएफ किंवा आसाम रायफल्स या ठिकाणी भरतीला प्राधान्य ( खात्री नव्हे ) देण्यात येईल अशी गृहमंत्रालयाने घोषणा केलेली आहे मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मुळातच सरकारला लष्कराचा खर्च कमी करायचा आहे त्यामुळे ही योजना आणण्यात आलेली असून पुढील काळात जबाबदारी घेऊन लष्कराची भरती केंद्र सरकारकडून कितपत करण्यात येईल यावर देखील प्रश्नचिन्ह असल्याने या योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे तर मोदी समर्थक याला ‘ मास्टरस्ट्रोक ‘ म्हणत असून विरोधी पक्षांकडून मात्र देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी काय कामाची ? केवळ चार वर्षांसाठी नोकरी केल्यानंतर शिक्षण करायच्या वयात नोकरी करायची आणि त्यानंतर वय निघून गेल्यावर शिक्षणाचे देखील दरवाजे आणि आजची उमेद राहणार नाही अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर देशात बेरोजगारी आणखीनच वाढणार असून अत्यल्प शिकलेले हे जवान तरी यानंतर काय करणार कारण या अग्नीवीरांना ग्रॅज्युटी, पेन्शन या प्रकारचा कोणताही लाभ कधीच मिळणार नाही असे केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तर निवृत्त सैनिकांनी देखील आपला जॉब हाच फक्त चार वर्षांसाठी असल्याने हे अग्नीवीर किती आक्रमक राहतील यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत अग्नीवीर यांच्या या मानसिकतेचा शत्रूराष्ट्र फायदा देखील घेऊ शकतात ही देखील चिंता व्यक्त केली आहे .


शेअर करा