‘ आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का ? ‘

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज १०० वा वाढदिवस साजरा होता. त्यामुळे पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले आणि त्याची फोटोग्राफी देखील केली आणि मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आल्यावर काँग्रेसने एक खोचक सवाल विचारला आहे.

नाना पटोले यांनी याबद्दल एक ट्विट केले असून “आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का? असो! आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना! ” असं म्हटले आहे.. गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार असून हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात.


शेअर करा