अखेर एमपीएससी आयोगाने ‘ तो ‘ निर्णय फिरवला, उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण

शेअर करा

राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर मानली जात आहे. एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा देण्याचा निर्णय पुन्हा फिरवण्यात आलेला असून उपलब्ध वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससी परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य आता विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणेच कितीही वेळा परीक्षा देता येणार असून त्यामुळे त्यांचे मानसिक मनोबल देखील उंचावण्यास मदत होणार आहे.

एमपीएससी विभागाने निवड प्रक्रियेत सुधारणेचा भाग म्हणून 2020 मध्ये सुधारणा करत एमपीएससीच्या पदांसाठी आधी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला परीक्षेच्या सहा संधी तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराला चार संधी तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवाराला कमाल संधींची मर्यादा लागू राहणार नाही असे एका परिपत्रकात म्हटले होते मात्र त्याविषयी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती तर अनेक प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत होता.

दीड वर्षातच एमपीएससी आयोगाने पूर्वीचा निर्णय फिरवलेला असून लोकसेवा आयोगाने बुधवारी परिपत्रक काढून 30 डिसेंबर 2020 आणि 27 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेला निर्णय रद्द करत असल्याचे म्हटले आहे.


शेअर करा