‘ अबकी बार 48 पार ‘, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला 2024 चा मास्टरप्लॅन

शेअर करा

2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तब्बल दोन वर्षे आधीच कंबर कसली असून महाराष्ट्रात मिशन 48 ची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी या मिशन कार्यकर्त्यांनी ऍक्टिव्ह होण्याचा सल्ला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेला आहे.

सध्या विरोधकांच्या ताब्यात असलेल्या 16 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रभारी व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेले असून आगामी काळात कशा पद्धतीने काम करायचे याचा देखील प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली असून असून भाजपच्या प्रमुख नेत्यांची मुंबई येथे बैठक पार पडली होती यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस,राम शिंदे चंद्रशेखर बावनकुळे, अशिष शेलार हे देखील उपस्थित होते.

समितीच्या बैठकीत ‘ लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा आणि पंतप्रधान मोदी यांनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा ‘ असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून विरोधकांच्या ताब्यात असलेल्या सोळा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे या व्यतिरिक्त आम्ही आणखी आठ जागांवर लक्ष ठेवणार असून त्यानुसार रणनिती सुरू आहे.

पक्ष बांधणी, संघटनात्मक ताकद वाढवणे यावर भाजपचे नियमितपणे काम सुरू असून 2014 ची लोकसभा जिंकल्यानंतर आम्ही 2019 ची विधानसभा जिंकल्याची देखील पूर्णपणे तयारी केली होती. केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असे आमचे काम नसून लवकरात लवकर 48 लोकसभा मतदार संघात आम्ही संघटनात्मक ताकद वाढवणार आहोत. सर्व 48 जागा जिंकणे सोपे नाही मात्र आम्ही प्रयत्न करणार आहोत ‘, असेही फडणवीस यांनी म्हटले.


शेअर करा