देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली ? हनी ट्रॅपचा शिकार झाला इंजीनिअर

शेअर करा

देशात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून एका पाकिस्तानी महिलेसोबत देशाची संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपात डी आर डी ओ येथील एका इंजिनियरला अटक करण्यात आलेले आहे. देशाच्या क्षेपणास्त्र विकासाबाबत गोपनीय माहिती त्याने या पाकिस्तानी महिलेसोबत शेअर केली असा त्याच्यावर आरोप आहे. सदर महिलेने तिची ओळख लपवत आपण ब्रिटन येथील एक पत्रकार असल्याची माहिती त्याला दिली होती.

उपलब्ध माहितीनुसार, संशयित आरोपीचे नाव दुक्का मल्लिकार्जुन रेड्डी असे असून तो विशाखापटनमचा रहिवासी आहे. डी आर डी ओ यांच्या बाळापूर येथील रिसर्च सेंटरमध्ये तो काम करतो. मालापूर पोलिसांनी त्याला नीरपेठ येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे दोन मोबाईल फोन एक सिम कार्ड आणि लॅपटॉप आढळून आलेला असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.

संशयित व्यक्तीने एका खाजगी कंपनीमध्ये दोन वर्षे नोकरी केल्यानंतर डी आर डी ओ लॅबमध्ये नोकरी सुरू केली होती. आपल्या फेसबुक प्रोफाईलवर त्याने या संदर्भात माहिती दिल्यानंतर आपण ब्रिटन येथील पत्रकार आहोत असे सांगत पाकिस्तानी येथील एका महिलेने त्याच्याशी संपर्क साधला होता. सदर महिला ही नताशा राव, सिमरन चोपडा अशी नावे वापरतात त्याच्याकडे माहिती मागत होती त्या वेळी त्यांनी ती माहिती पुरवली असा त्याच्यावर आरोप आहे.


शेअर करा