धक्कादायक .१४३ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार..पोलिसांनी लिहले ४२ पानी एफआयआर

  • by

आपल्या देशात अनेक चित्रविचित्र घटना रोज समोर येत असतात अशातच पोलिसांकडे एक वेगळीच तक्रार दाखल झाली असून पीडित महिलेने तिच्यावर तब्बल १४३ लोकांनी अनेकदा बलात्कार आणि अतिप्रसंग केल्याची कैफियत मांडलेली आहे . तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये ही घटना घडली असून महिलेचे वय २५ वर्षे आहे . तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घडलेल्या घटनांत तब्बल १४३ लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केल्याचा दावा तिने ठोकला असून या प्रकरणात पोलिसांनी ४२ पानांचा एफआयआर नोंदवला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी हा 42 पानांचा एफआयआर नोंदविला असून या पानांमध्ये 143 लोकांची माहिती आहे. या सर्व लोकांविरोधात पीडितेने बलात्कार तसेच अतिप्रसंग केल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार असून यामध्ये काही महिलाही समावेश आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

पीडित महिलेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत ते तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. पुढे पीडित महिलेचे लग्न झाले आणि लग्नानंतर देखील या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. पुढे वाद विकोपाला गेले आणि त्यानंतर तिने नवऱ्यापासून तलाक घेतला.

तलाक घेतल्यानंतर तिने उरलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले आणि जवळील एका कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र तिथेही तिच्यावर वेळोवेळी अनेक जणांनी बलात्कार केला असल्याचे तिचे म्हणणे आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचाराची शिकार बनली आहे मात्र घाबरून ती शांत राहिली मात्र आता त्रास असह्य होऊ लागल्याने तिने पहिल्यांदाच पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे.