काय चाललंय..आता ‘ त्या ‘ क्रेडिटवरून समर्थकात राजकारण पेटले

शेअर करा

नगर जिल्ह्यातील 44 गावांची बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजना ही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून पुन्हा पूर्ववत झालेली आहे मात्र नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून केवळ बैठकीचा फार्स करण्यात आला आणि या कामाचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप आता कर्डिले यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे मात्र कारण काहीही असले तरी 44 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला यामुळे ग्रामस्थ मात्र समाधानी आहेत.

नगर शहरातून जाणाऱ्या गॅस पाईप लाईनच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजना हि विस्कळीत झालेली होती तसेच या आधी देखील अनेक वेळा थकीत वीज बिलापोटी या योजनेचा पाणीपुरवठा अनेकदा खंडित करण्यात आलेला होता. सदर प्रकरणी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेतली त्यावेळी लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करा नाहीतर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला होता.

सदर प्रकाराची जोरदार चर्चा सामाजिक माध्यमांमधून होऊ लागल्यानंतर बुऱ्हाणनगर योजनेतील बहुतेक ग्रामपंचायती ह्या शिवाजी कर्डिले यांच्या ताब्यात असल्यामुळे मंत्री तनपुरे त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत असा देखील आरोप कर्डीले समर्थकांकडून करण्यात आला तसेच वीज बिल ग्रामपंचायतींनी भरायचे आणि मंत्री यांनी बैठकीचा फार्स घेऊन स्वतः क्रेडिट घ्यायचे असा देखील आरोप कर्डीले समर्थकांकडून करण्यात येत होता.

बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी योजना ही केवळ माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सुरू झालेली आहे त्यामुळे याप्रकरणी पाणीपुरवठा सुरळीत केल्याचे क्रेडिट कोणी घेऊ नये असा देखील इशारा कर्डिले समर्थकांकडून देण्यात आलेला आहे.


शेअर करा