नगर ब्रेकिंग..अत्याचार करून गळा आवळणार इतक्यात आई आली अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून राहुरी येथील एका गावात एका अल्पवयीन मुलीला घरातून उचलून तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रकार करण्यात आलेला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अवघ्या पाच वर्षाची असून 18 जून रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, किशोर विजय पवार असे या नराधमाचे नाव असून पीडित मुलीचे आई वडील बाहेरगावी गेले होते. त्याचा फायदा घेत आरोपी किशोर विजय पवार ( राहणार आरडगाव तालुका राहुरी ) याने मुलीला घरातून उचलले आणि शेताच्या बांधावरजवळ तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर सदर प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून तो तिचा गळा आवळ्याचा प्रयत्न करत होता मात्र याच वेळी मुलीचा शोध घेत असलेल्या आईला हा प्रकार दिसला आणि तिने आरडाओरडा सुरु केला.

नागरिक गोळा होऊन आता आपली धुलाई होणार हे लक्षात आल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले आणि पीडित मुलीच्या आईवडिलांनी तात्काळ मुलीला पुढील उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली असून संशयित आरोपी किशोर पवार याच्याविरोधात अपहरण बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र खाडे, उपनिरीक्षक एसबी देवरे, राहुरी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सज्जन नारेडा हे करत आहेत.


शेअर करा