मोठी बातमी..करुणा शर्मा यांना अखेर ‘ त्या ‘ प्रकरणात अटक

शेअर करा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्याविरोधात पुणे इथे अॅट्रोसिटीचा गुन्हा करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद दिल्यावर अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना अटक केली आहे. पुण्यातील येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे .

काय आहे प्रकरण ?

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . ‘ पतीला घटस्फोट दे नाहीतर तुला जीव गमवावा लागेल ‘, अशी धमकी देत करुणा यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली आणि घटस्फोट देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली ,’ अशी फिर्याद येरवडा पोलिस ठाण्यात देण्यात आलेली होती .

महिलेने म्हटल्याप्रमाणे, ‘ फिर्यादी महिला आणि तिचे पती हे उस्मानाबाद येथे राहायला होते. 2011 मध्ये त्यांची करुणा शर्मा यांच्यासोबत ओळख झाली आणि आणि त्यानंतर फिर्यादी यांचे पती वारंवार त्यांच्या घरी जाऊन राहत होते त्यानंतर आम्ही पुणे येथे स्थायिक झालो. त्यानंतर माझा पती मी करुणासोबत लग्न करणार आहे तू मला घटस्फोट दे असे सांगून त्याने माझा छळ सुरू केला तसेच करुणा शर्मा हिने हॉकी स्टिक्सचा धाक दाखवात मला जातीवाचक शिवीगाळ केली ,’ असे महिलेने म्हटले आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू झालेली असून धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या वादाची किनार देखील या प्रकरणाला असावी अशी देखील कुजबूज सुरू आहे.


शेअर करा