अन चक्क रुग्णालयातच माहेरचे अन सासरचे भिडले , झाली तुफान हाणामारी

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बीड इथे उघडकीला आले असून तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर रुग्णालयातच माहेरचे व्यक्ती आणि सासरचे व्यक्ती यांच्यात तुफान हाणामारी झाली. शहरातील नाळवंडी नाका येथे हे कुटुंबीय रहायला होते महिलेचा पती शिक्षक असून माहेरच्या व्यक्तींनी सासरच्याविरुद्ध रोष व्यक्त करत त्यांना जोरदार मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार, सीमा निलेश राठोड ( वय 22 ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिचा निलेश राठोड याच्यासोबत विवाह झाला होता. निलेश हा खाजगी संस्थेत शिक्षक असून 16 तारखेला सीमा यांनी घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर रुग्णालयात पोस्टमार्टमच्या वेळी दोन्ही बाजूकडील परिवारामध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आणि त्याचे मारहाणीत रूपांतर झाले.

सदर घटनेनंतर रूग्णालयात चांगलाच गोंधळ उडाला विशेष म्हणजे यावेळी सुरक्षारक्षक देखील गायब होते मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईक यांची समजूत काढली त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर नातेवाईकांकडे मृतदेह सोपविण्यात आला. सदर घटनेप्रकरणी कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असल्याचे समजते.


शेअर करा