पाथर्डीत धरपकड सुरु , आणखी ‘ तब्बल ‘ इतके जण पोलिसांच्या ताब्यात

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात देवराई इथे सहकारी संस्थेच्या निवडणुकीनंतर विजय पॅनलच्या मिरवणुकीवर तलवार चालवण्याचा प्रकार उघडकीला आला होता यामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाथर्डी पोलिसांनी कारवाई करत आणखी दहा संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे तर यामध्ये अजय गोरक्ष पालवे या तरुणाचा मृत्यू झालेला असून मनोहर पालवे, विष्णू पालवे, वैभव पालवे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

सदर प्रकरणी बाळासाहेब नवनाथ पालवे यांनी फिर्याद दिली असून सोळा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटना घडल्यानंतर अनिल पालवे आणि त्याचे पाच साथीदार हे तिसगाववरून एका गाडीतून पळून जात असताना पाथर्डी गुप्तवार्ता विभागाचे पोलीस कर्मचारी भगवान सानप, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी सुमारे दीड तास पाठलाग करून अनिल एकनाथ पालवे, संजय विष्णू कारखिले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, दिनकर सावळेराम पालवे यांना नेवासा फाटा येथून ताब्यात घेतले.

शनिवारी संध्याकाळी निकाल लागल्यानंतर सत्ताधारी गटाला अकरा जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागा मिळाल्या त्यानंतर आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्याला गालबोट लागले होते आणि मारामारीला सुरुवात झाली या दरम्यान दोन जणांना जोरदार मारहाण करण्यात आल्याने त्यांना नगर येथे रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. मयत व्यक्तीचे नाव अजय गोरख पालवे असे असल्याचे समजते.

घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केले आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली त्यावेळी पाथर्डी-शेवगाव चे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचे काम केले. जमाव काही प्रमाणात शांत झाल्यानंतर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयितांची धरपकड सुरु आहे.

अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे यांना तलवारीने मारहाण करण्यात आलेली आहे त्यामध्ये दुर्दैवाने अजय गोरख पालवे यांचा मृत्यू झालेला असून देवराई इथे तणावाचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे आश्वासन दिले आहे.