नगर ब्रेकींग.. आता ‘ हा ‘ रुमाल घरी जाऊन सोडा , घरी गेल्यावर..

नगर शहराचा फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून सोन्याच्या दागिन्याचे तुम्हाला दुप्पट पैसे देतो असे सांगून दोन जणांनी महापालिकेच्या सफाई कामगार असलेल्या महिलेची फसवणूक केलेली आहे. सदर भामट्यांनी या महिलेला आर्थिक आमिष दाखवले आणि त्यानंतर त्यांच्याकडील अडीच तोळ्याचे दागिने घेऊन फरार झाले आणि पैशाऐवजी रुमालात दगड बांधून यांना देण्यात आले. पुणे, कोल्हापूर या ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणुकीचे प्रकार याआधी घडलेले आहेत मात्र नगरमध्ये देखील याच पद्धतीने फसवणूक सुरू झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

सदर प्रकरणी, संगिता रमेश चवालीया ( वय 55 राहणार मंगलगेट ) यांनी फिर्याद दिली असून संगीता या त्यांच्या नातीसोबत बाजारपेठेत गेलेल्या असताना त्यांना दोन युवक भेटले आणि त्यांनी दोन लाख रुपये आहेत असे सांगून त्यांना ते पैसे देखील त्यांना दाखवले आणि त्यातील एक जण तुमच्याजवळ किती सोने आहे ते मला काढून द्या मी तुम्हाला त्याच्या दुप्पट पैसे देतो असे आमिष दाखवले आणि त्याला संगीता या भुलल्या.

संबंधितांनी बोलण्याच्या ओघात त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर संगीता यांनी त्यांच्याकडील दीड तोळ्याचे मिनी गंठण तसेच एक तोळ्याचे कानातील दागिने दिले त्यानंतर त्यांनी संगीता यांना हातात गाठोडे बांधलेला एक रुमाल दिला आणि हा रुमाल घरी जाऊन सोडा असा सल्ला देखील दिला. संगीता यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यामध्ये फक्त दगड आढळून आले त्यामुळे या भामट्यांनी आपल्याला फसवल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.