घराच्या अंगणात झोपलेल्या तरुणाचा ‘ प्रायव्हेट पार्ट ‘ कापून नेला , पत्नी म्हणतेय की..

देशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून अंगणात झोपलेल्या एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट अज्ञात व्यक्तीने कापून नेला आहे . झारखंड येथील पलामू जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली असून प्रायव्हेट पार्टचा कापलेला भाग अजूनही सापडलेला नाही मात्र या तरुणावर मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत आणि पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, पलामू जिल्ह्यात रामगढ भागातील नावाडीह इथे शुक्रवारी म्हणजे 17 जूनला पीडित छत्तीसगढमध्ये झालेल्या एका लग्नातून परत आला अन घराच्या अंगणातच तो झोपला होता. रात्री साधारण 11 ते 12 वाजता कुणीतरी तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याने पलायन केले . तरुणाला लक्षात आले तेव्हा रक्त वाहत होते. तो रडू लागल्यावर त्याला कुटुंबीयांनी दवाखान्यात दाखल केले. घटनेमागील कारण नक्की काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पीडितच्या कुटुंबियांना त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून हे काम केलं असावं असा संशय आहे .

12 मे 2021 रोजी पीडित तरूणाचं लग्न झालं होतं मात्र तरूणीचं एका दुसऱ्या तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याचे लग्नानंतर समजले होते. घटनेनंतर पीडित तरूणाच्या पत्नीचा मोबाइल चेक करण्यात आला तेव्हा घटनेच्या काही वेळाआधी रात्री 11 दरम्यान ती फोनवर कुणासोबत तरी बोलत असल्याचे समोर आले आहे मात्र ती ह्या विषयावर काहीच बोलायला तयार नाही.

गुप्तांग कापण्यात आल्यावर बरंच रक्त वाहून गेलं त्यामुळे आता पाईप जोडून पाइपच्या माध्यमातून तरूणाची लघवी बाहेर काढली जात आहे. एखाद्या धारदार शस्त्राने तरूणाचं गुप्तांग कापण्यात आलं आहे मात्र गुप्तांग कुणी कापलं हे पोलिसांना अजूनही समजलेलं नाही. सदर प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा असून आपल्यासोबत हे घडत असताना हा युवक कसल्या धुंदीत होता हे देखील तपासले जात आहे.