नगर ब्रेकिंग..अखेर ‘ त्या ‘ प्रकरणातील दोन्ही आरोपींवर न्यायालयाचा निर्णय आला

शेअर करा

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आली होती. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर मुलगी गर्भवती झाल्यावर हे प्रकरण सुरुवातीला पोलिसात आणि त्यानंतर न्यायालयात पोहोचले होते. सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भानुदास गंगाराम भिसे ( राहणार धारकरवाडी तालुका श्रीगोंदा ) आणि नामदेव अंबु अडागळे ( राहणार श्रीगोंदा ) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने अडवोकेट पुष्पा गायके-कापसे यांनी बाजू मांडली होती.

सदर आरोपींनी अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता. आरोपींपैकी एक जणाने शेतात तर दुसऱ्याने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. सातत्याने हा प्रकार घडल्यानंतर ही गर्भवती राहिली आणि हे प्रकरण समोर आले. मुलीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तपासामध्ये हे कृत्य या आरोपींनी केल्याचे समोर आले आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले होते.


शेअर करा