लहान मुलाला कोब्रा चावला अन एक मिनिटात ‘ कोब्रा ‘ तडफडून मेला, देशातील दुर्मिळ घटना

शेअर करा

देशात एक चमत्कारीक घटना समोर आलेली असून एका अल्पवयीन मुलाला साप चावल्यानंतर चक्क विषारी सापाचा मृत्यू झालेला आहे. बिहार येथे गोपालगंज भागात ही घटना उघडकीला आलेली असून बालकाला यामध्ये काहीही इजा झाली नाही नसून त्याचे वय चार वर्षे आहे. सदर घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून कोब्रा प्रकारातील सापाने या मुलाचा चावा घेतला होता..

उपलब्ध माहितीनुसार, चार वर्षीय बालक हा घराच्या भोवती खेळत असताना अचानकपणे एका विषारी सापाने त्याचा चावा घेतला त्यानंतर बालकाला काहीही इजा झाली नाही उलट एक मिनिटातच तडफडून या सापाचा मृत्यू झाला. काळजी म्हणून अनुज कुमार नावाच्या या बालकाला त्याच्या घरच्यांनी दवाखान्यात दाखल केले त्यावेळी या सापाने त्याच्या पायाचा चावा घेतल्याचे दिसून आले.

अनुजकुमार याच्यासोबत खेळणारी मुले सापाने चावा घेतल्याचे पाहिल्यानंतर पळून गेली मात्र त्याने घरी जाऊन पायाला साप चावला असे सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी काठ्या घेऊन सापाला मारण्यासाठी धाव घेतली मात्र त्याआधीच सापाचा तडफडून मृत्यू झालेला होता. अनुजकुमार हा पूर्णपणे ठीक असून काळजीचे कुठलेही कारण नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा