केतकी चितळे हसत हसत आली तुरुंगाच्या बाहेर , आता म्हणतेय की..

शेअर करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह कविता पोस्ट केल्याप्रकरणी अटक केलेली अभिनेत्री केतकी चितळे हिची गुरुवारी संध्याकाळी ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली. संध्याकाळी तिची सुटका झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसून आला नाही, उलट ती हसत हसत पत्रकारांना सामोरे जात होती. तिच्याविरुद्ध ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.

ठाणे सत्र न्यायालयाने बुधवारी तिला वीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. केतकी चितळे हिच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात देखील ॲट्रॉसिटी प्रकरणात गुन्हा दाखल आहे मात्र तिला सत्र न्यायालयाने याआधीच जामीन मंजूर केलेला आहे. ‘ काही व्यक्ती मुंबई फुकट दर्शनासाठी येतात ‘ अशी आक्षेपार्ह पोस्ट तिने सोशल मीडियावर टाकली होती त्यानंतर तिच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळाल्याने तिची कारागृहातून सुटका करण्यात आली त्यावेळी हसत हसतच ती कारागृहाबाहेर पडली होती. कारागृहात मुलांना मी शिकवत होते आणि खूप छान वाटत होते त्यांना तिथे शिक्षकांची गरज आहे, असे देखील ती पुढे म्हणाली.


शेअर करा