एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हाथ ? चंद्रकांत पाटील म्हणाले की..

शेअर करा

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापाठीमागे कोण आहे याची जोरदार चर्चा सुरू असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे याबद्दल आपले मत व्यक्त करताना, ‘ भाजपाकडे कुणी सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयावर राज्याची कोर कमिटी विचारविनिमय करून केंद्रीय नेतृत्वाकडे यासंदर्भात शिफारस करत असते आणि त्यानंतर पक्षाची केंद्रीय समिती निर्णय घेते असे सांगण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनी या प्रकरणावर भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता त्यावर आपले मत विचारले असताना ते म्हणाले की, ‘ देशांमध्ये सर्वांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तसेच ते शरद पवार यांनाही आहे आणि त्यानुसार ते त्यांचे मत व्यक्त करत असतात. महाविकासआघाडी पडण्यासाठी भाजप जबाबदार नाही मात्र अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण याआधी म्हणत होतो असेही ते पुढे म्हणाले.

महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही शिवसेनेसोबतच असल्याचे दिसून येत आहे मात्र शिवसेनेतच फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे मात्र शिवसेनेने आता ‘इमोशन्स’वर काम करण्याचे ठरवले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

भावनात्मक राजकारण हा शिवसेनेचा मूळ गाभा आहे त्यामुळे शिवसेनेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये सहानभूती निर्माण करायची आणि निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन राज्यातील वातावरण ‘भावनिक ‘ करायचे असे ठरलेले आहे. विधिमंडळातील लढाई लांबवली जाऊन जनतेत बंडखोरांच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप निर्माण केल्यावर बंडखोर आमदारांची कोंडी होत जाईल आणि शिवसेनेत अखेर ते परततील तसेच ३७ पेक्षा एकही आमदार कमी असला तरी हे बंड पूर्णपणे फसेल असा प्लॅन करण्यात आलेला आहे.

राज्यातून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली असल्याचे चित्र असून याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मीटिंग झालेली असून त्यामध्ये शरद पवार यांनी कायदेशीर लढाईचे ‘ मी बघतो तुम्ही रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जाऊन सहानुभूती प्राप्त करण्यासाठी जी काही पावले उचलावी लागतील ती उचलावीत. कायद्याच्या लढाईचे टेन्शन घेऊ नका ‘ असे सांगितल्याची देखील चर्चा आहे.


शेअर करा