खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राज्यात सत्ताबदलाचे दिले स्पष्ट संकेत , म्हणाले की ?

शेअर करा

नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी राहुरी येथे पालखी पूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंढरीचा पांडुरंग हा नेहमी योग्य माणसाला आषाढी पूजासाठी बोलवत असतो त्यामुळे ‘ यावर्षी योग्य माणसाच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे ‘, असे सांगत राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेले आहेत.

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, ‘ कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून दिंडीचा सोहळा बंद होता मात्र आता पांडुरंगाला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी जात आहेत. त्यांची आणि दिंडीची व्यवस्था चांगली व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे. नगर मनमाड मार्ग आणि नगर करमाळा मार्ग हा सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने अडथळ्याचा बनलेला आहे मात्र केंद्राकडून तातडीने मी 13 कोटी रुपये मंजूर करून दिंडीसाठी ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी मुरूम मार्ग तयार करून तात्काळ रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी सूचना दिलेल्या आहेत.

महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती पाहता वारकऱ्यांनी यामध्ये लक्ष न देता पांडुरंगाचा धावा करावा. देवाच्या मनामध्ये जो असतो तोच आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करतो त्यामुळे पंढरीचा पांडुरंग यावेळी देखील योग्य माणसाला आषाढी पूजेसाठी बोलावेल, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष श्री अविनाश कांबळे, भाजपचे जेष्ठ नेते श्री आसाराम धुस, दिंडी प्रमुख ह.भ.प नाना महाराज गागरे,सरपंच श्री नारायण झावरे, श्री चांगदेव किंनकर, माजी सभापती श्री भीमराज हारदे, माजी सभापती सौ. मनीषा ओहळ, डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राहुरी तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी, ट्रस्टचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेअर करा