नगर ब्रेकिंग..ग्रामपंचायतीचे रजिस्टर ९ घेऊन व्यक्तीने ठोकली धूम

नगर तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीला आलेली असून अंबिलवाडी येथे असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात एका व्यक्तीने महिला ग्रामसेविका यांना तसेच सरपंच यांना धक्काबुक्की करत कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत कार्यालयात असलेले रजिस्टर नंबर ९ पळवून नेले आहे. 24 तारखेला ही घटना घडलेली असून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नगर तालुक्यातील अंबिलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात 24 तारखेला दैनंदिन कामकाज सुरू असताना तिथे आरोपी आकाश दिलीप भोईटे हा आला आणि त्याने ग्रामसेविकेला मला रहिवासी दाखला द्या अशी मागणी केली. ग्रामसेविका यांनी त्याला रहिवासी दाखला देण्याचे काम बंद झालेले आहे असे सांगितले असता त्याचा संताप अनावर झाला आणि सरपंच यांना तो रहिवासी दाखला देण्यासाठी मागणी करू लागला त्यावेळी सरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून रहिवासी दाखले मिळत नाहीत असे सांगितल्याने त्याला राग आला आणि त्याने फिर्यादी आणि साक्षीदार यांना धक्काबुक्की करून तेथील महत्त्वाचे रजिस्टर नंबर ९ घेऊन पलायन केले.

ग्रामसेविका आणि सरपंच यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर पथक पाठवून त्याला अटक केली आहे आणि रजिस्टर पळवून नेलेले रजिस्टर ताब्यात घेण्यात आलेले आहे.