नगर दक्षिणमध्ये शिवसेनेची काय परिस्थिती ? शशिकांत गाडे म्हणाले की ..

राज्यात सध्या मोठे राजकीय घमासान सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र बहुतांश शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे. नगर दक्षिणेतील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत, यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसैनिकांची मंगळवारी 28 तारखेला नगर शहरात बैठक होणार असल्याची माहिती दक्षिण जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी दिलेली आहे.

शशिकांत गाडे म्हणाले की, ‘ शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध आघाड्यातील प्रमुखाशी बोलणे झाले असून सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राज्यातील परिस्थितीचा जिल्हा स्तरावर कुठलाही परिणाम झालेला नसून सर्वजण ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट आहे . ‘

गाडे पुढे म्हणाले की, ‘ यापूर्वी देखील शिवसेना अनेकदा फुटली मात्र सामान्य शिवसैनिक हा कधीच पक्षाच्या विरोधात गेला नाही. नेता फुटला तरी शिवसैनिक हा कधीच फुटत नसतो यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या संवाद योग्य रितीने व्हावा यासाठी 28 तारखेला सकाळी बारा वाजता नगरमधील नक्षत्र लॉन येथे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक ,शहरप्रमुख, तालुका प्रमुख ,युवासेना महिला आघाडी,कामगार सेना यांची बैठक आयोजित केलेली आहे यासाठी सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे सांगण्यात आले आहे.