शरण येत नाही म्हणून बदनामी ? एकनाथ शिंदे यांच्या ‘ त्या ‘ व्हिडिओमागील सत्य काय ?

शेअर करा

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आज पाचवा दिवस उजाडला आहे. शिवसेनेच्या 38 आमदारांसह गुवाहाटीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आमदार तळ ठोकून आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे राज्याच्या राजकारणात आणि सोशल मीडियात एकनाथ शिंदे यांच्या एका व्हिडीओची चांगलीच चर्चा असून शिंदे दारुच्या नशेत होते का ? असा प्रश्न विचारला जात आहे आणि त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून बदनाम देखील केले जात आहे मात्र या व्हिडिओची वस्तुस्थिती वेगळी आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार सूरत विमानतळावरुन गुवाहाटीला जात होते त्यावेळी सूरत विमानतळावर माध्यमांच्या प्रतिनिधींची प्रचंड गर्दी केली होती. बसेसमधून शिंदे आणि सर्व आमदार उतरल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी तुटून पडले. तेव्हाचा हा व्हिडीओ असून संपूर्ण व्हिडीओ 2 मिनिटांचा आहे मात्र त्यातील 30 सेकंदाची क्लिप व्हायरल करून शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे .माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींच्या कोंडाळ्यात आणि पोलिसांच्या घाई गडबडीत शिंदे यांना व्यवस्थित उभे राहता येत नव्हते. एकनाथ शिंदे हे दारूच्या नशेत नव्हते तर त्यांना गर्दीमुळे उभे राहता येत नव्हते मात्र याच व्हिडीओवरून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे शिंदे यांचे समर्थक देखील प्रत्युत्तर देताना दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना हादरून गेली असून अद्यापही रोज नवनवीन झटके शिवसेनेला बसत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल होते ते देखील आता गुवाहाटी इथे गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे अशा परिस्थितीत शिवसेनेत आता विधानसभेत निवडून आलेले एकमेव मंत्री म्हणजे आदित्य ठाकरे हेच राहिलेले आहेत.बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री असून शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे मात्र त्यामुळे शिवसेनेचे अख्ख मंत्रिमडळं रिकामं झालं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण कोण ?

  1. एकनाथ शिंदे
  2. उदय सामंत
  3. गुलाबराव पाटील
  4. संदीपान भुमरे
  5. शंभुराज देसाई
  6. अब्दुल सत्तार
  7. अनिल बाबर
  8. तानाजी सावंत
  9. चिमणराव पाटील
  10. प्रकाश सुर्वे
  11. भरत गोगावले
  12. विश्वनाथ भोईर
  13. संजय गायकवाड
  14. प्रताप सरनाईक
  15. राजकुमार पटेल
  16. राजेंद्र पाटील
  17. महेंद्र दळवी
  18. महेंद्र थोरवे
  19. प्रदीप जयस्वाल
  20. ज्ञानराज चौगुले
  21. श्रीनिवास वनगा
  22. महेश शिंदे
  23. संजय रायमूलकर
  24. बालाजी कल्याणकर
  25. शांताराम मोरे
  26. संजय शिरसाट
  27. दादा भूसे
  28. प्रकाश आबिटकर
  29. योगेश कदम
  30. आशिष जयस्वाल
  31. सदा सरवणकर
  32. मंगेश कुडाळकर
  33. दीपक केसरकर
  34. यामिनि जाधव
  35. लता सोनावणे
  36. किशोरी पाटील
  37. रमेश बोरणारे
  38. सुहासे कांदे
  39. बालाजी किणीकर

शेअर करा