धक्कादायक..बहिणीच्या प्रियकराला पेट्रोल पंपाच्या मागे नेले अन ..

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बीड जिल्ह्यात उघडकीला आलेली असून बहिणीच्या प्रेमाला विरोध करून भावाने तिच्या प्रियकराची चाकूने वार करत हत्या केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील नाथापूर येथे घडलेला आहे. 25 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडलेली असून घटनेनंतर आरोपी फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुंदर साहेबराव कसबे ( वय 22 राहणार पिंपळादेवी तालुका बीड ) असे मयत व्यक्तीचे नाव असून ऊस तोडणीचे काम करत असताना त्याची ओळख माजलगाव तालुक्यातील एका तरुणीशी झाली होती आणि त्यानंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. महिन्याभरानंतर दोघेही जण आपापल्या घरी गेले मात्र त्यानंतर विरह सहन होत नसल्याने सुंदर याने या मुलीला घेऊन पलायन केले होते मात्र अखेर पुन्हा कुटुंबियांच्या विरोधानंतर मुलीला तिच्या घरी स्वाधीन करण्यात आले मात्र मुलीचा भाऊ शिवाजी चांदणे याच्या मनात आपली बहीण पळून गेल्याचे दुःख होते.

२५ जून रोजी सुंदर कसबे हा आठवडी बाजारात आलेला असताना आईला बाजारात सोडून पेट्रोल भरण्यासाठी तो गेला त्यावेळी तिथे शिवाजी चांदणे हा हजर होता आणि त्याने दमदाटी करत सुंदर कसबे याला पेट्रोल पंपाच्या पाठीमागे नेले आणि तिथे चाकूने त्याच्यावर सपासप वार केले आणि त्यानंतर तो फरार झाला परिसरात आरडाओरडा झाल्यानंतर नागरिक धावले तोपर्यंत सुंदर रक्ताच्या थारोळ्यात होता आणि त्याचा मृत्यू झालेला होता.

घटना घडल्याचे समजताच अवघ्या काही मिनिटांच्या आत पिंपळनेर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक बाबासाहेब खरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिलेला असून आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत .